महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित भरती २०२३ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित भरती २०२३
एकूण पदे : ३९
पदांचे नाव :
पद क्र | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
१ | सहाय्यक अधीक्षक (गट-क) | ०१ |
२ | कनिष्ठ अभियंता (गट-क) | ०१ |
३ | जनता सहायक (गट-क) | ०२ |
४ | तंत्र सहायक (गट-क) | ०६ |
५ | मार्गदर्शक व्याख्याता (गट-क) | ०१ |
६ | उप आवेक्षक (गट-क) | ०६ |
७ | छायाचित्रचालक (गट-क) | ०१ |
८ | अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) | ०१ |
९ | फार्शीज्ञात संकलक (गट-क) | ०१ |
१० | रसायनशास्त्रज्ञ (गट-क) | ०१ |
११ | संशोधन सहाय्यक (गट-क) | ०१ |
१२ | संकलक (गट-क) | ०२ |
१३ | सहाय्यक छायाचित्रचालक (गट-क) | ०१ |
१४ | ग्रंथपाल लिपिक-नि-भांडारपाल (गट-क) | ०१ |
१५ | अभिलेख परिचर (गट-क) | ०१ |
१६ | तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) | ०१ |
१७ | अधीक्षक (गट-ब अराजपत्रित) | ०२ |
१८ | सहायक (गट-क) (कार्यालय-सां. कार्य) | ०२ |
१९ | सहायक संशोधन – अधिकारी (गट-ब अराजपत्रित) | ०४ |
२० | सहायक (गट-क) (कार्यालय-दर्शनिका) | ०२ |
२१ | टिप्पणी सहायक (गट-क) | ०१ |
शैक्षणिक पात्रता :
पदांचे नाव | पात्रता |
---|---|
सहाय्यक अधीक्षक (गट-क) | कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता |
कनिष्ठ अभियंता (गट-क) | शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता |
जनता सहायक (गट-क) | शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता |
तंत्र सहायक (गट-क) | प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, किंवा प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहास पदव्युत्तर पदवी किंवा संस्कृत किंवा पाली प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी |
मार्गदर्शक व्याख्याता (गट-क) | माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण |
उप आवेक्षक (गट-क) | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Bulding Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण |
छायाचित्रचालक (गट-क) | ०१) माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि ०२) कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक |
अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) | ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान द्वितीय वर्गातील पदवी धारण केली आहे |
फार्शीज्ञात संकलक (गट-क) | ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे |
रसायनशास्त्रज्ञ (गट-क) | ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे |
संशोधन सहाय्यक (गट-क) | ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे |
संकलक (गट-क) | ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे |
सहाय्यक छायाचित्रचालक (गट-क) | ०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीतील उत्तीर्ण केलेली असावी. ०२) मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक |
ग्रंथपाल लिपिक-नि-भांडारपाल (गट-क) | ०१) ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ०२) ज्याने ग्रंथलय शास्त्राची पदविका धारण केली आहे |
अभिलेख परिचर (गट-क) | ज्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे |
तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी |
अधीक्षक (गट-ब अराजपत्रित) | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण |
सहायक (गट-क) (कार्यालय-सां. कार्य) | शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण |
सहायक संशोधन – अधिकारी (गट-ब अराजपत्रित) | अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे |
सहायक (गट-क) (कार्यालय-दर्शनिका) | अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे |
टिप्पणी सहायक (गट-क) | पदवी धारण केलेली असावी |
वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
वयाची अट : १८ ते ४० वर्ष (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट)
अर्ज फी :
- अमगास – १०००/- रुपये
- मागासवर्गीय/ अनाथ/ दिव्यांग/ माझी सैनिक – ९००/- रुपये
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०५ सप्टेंबर २०२३
हे पण वाचा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची ८०२ जागांसाठी भरती
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.