जिल्हा परिषद सांगली भरती २०२३ : जिल्हा परिषद सांगली अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ७५४ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद सांगली भरती २०२३
एकूण पदे : ७५४
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
आरोग्य पर्यवेक्षक | ०४ |
आरोग्य सेवक (पुरुष) | १८५ |
आरोग्य सेवक (महिला) | २६६ |
औषध निर्माण अधिकारी | २३ |
कंत्राटी ग्रामसेवक | ५२ |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | २६ |
कनिष्ठ आरेखक | ०१ |
कनिष्ठ सहाय्यक | ३४ |
कनिष्ठ सहाय्यक लेखा | ०४ |
मुख्य सेविका/ पर्यवेक्षका | ०९ |
पशुधन पर्यवेक्षक | २२ |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०१ |
विस्तार अधिकारी (कृषी) | ०१ |
विस्तार अधिकारी (पंचायत) | ०१ |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | ०२ |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) | २३ |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
आरोग्य पर्यवेक्षक | विज्ञान शाखेची पदवी |
आरोग्य सेवक (पुरुष) | १) विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण २) राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून २० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य |
आरोग्य सेवक (महिला) | विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण & साह्यकारी प्रसाविका |
औषध निर्माण अधिकारी | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका |
कंत्राटी ग्रामसेवक | ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका |
कनिष्ठ आरेखक | १० वी उत्तीर्ण व स्थापत्य आरेखकाचा पाठ्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असावा |
कनिष्ठ सहाय्यक | १० किंवा १२ वी उत्तीर्ण इंग्रजी आणि मराठी मध्ये टंकलेखन |
कनिष्ठ सहाय्यक लेखा | १० किंवा १२ वी उत्तीर्ण इंग्रजी आणि मराठी मध्ये टंकलेखन |
मुख्य सेविका/ पर्यवेक्षका | समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण पदवी |
पशुधन पर्यवेक्षक | पशुवैद्यक शास्त्रातील पदवी |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | भौतीकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र/ सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी |
विस्तार अधिकारी (कृषी) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी विषयातील पदवी |
विस्तार अधिकारी (पंचायत) | कोणत्याही शाखेतील पदवी |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाड्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) | १) १० वी उत्तीर्ण २) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर |
वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- राखीव – ९००/- रुपये
नोकरी स्थान : सांगली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हा परिषद सांगली भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.