जिल्हा परिषद नागपूर भरती २०२३ : जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध पदासाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती मध्ये एकूण ५५७ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण हि सर्व या भरतीची माहिती खालीलप्रमाणे दिलेले आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी जाहिरात (PDF) संपूर्ण काळजीपूर्वक वाचने आवश्यक आहे. जाहिरातींची मूळ PDF खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.
जिल्हा परिषद नागपूर भरती २०२३
एकूण पदे : ५५७
पदांचे नाव :
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
आरोग्य पर्यवेक्षक | ०२ |
आरोग्य सेवक (पुरुष) | १०० |
आरोग्य सेवक (महिला) | ३०८ |
औषध निर्माण अधिकारी | ११ |
कंत्राटी ग्रामसेवक | २६ |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | २७ |
कनिष्ठ लेखा अधिकारी | ०२ |
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक वर्गीय) | १० |
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | ०६ |
मुख्य सेविका/ पर्यवेक्षका | ०५ |
पशुधन पर्यवेक्षक | ०३ |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | ०२ |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | ०१ |
वरिष्ठ सहाय्यक (लिपिक वर्गीय) | ०२ |
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | ०२ |
विस्तार अधिकारी (कृषी) | ०४ |
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) | ०९ |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | ०२ |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघु पाटबंधारे) | ३५ |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
आरोग्य पर्यवेक्षक | १) विज्ञान शाखेतील पदवी २) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्याचा कोर्स |
आरोग्य सेवक (पुरुष) | १) विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण २) राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून २० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य |
आरोग्य सेवक (महिला) | विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण & साह्यकारी प्रसाविका |
औषध निर्माण अधिकारी | औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका |
कंत्राटी ग्रामसेवक | ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा पदविका |
कनिष्ठ लेखा अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवी + ०५ वर्ष अनुभव |
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक वर्गीय) | १० वी उत्तीर्ण इंग्रजी आणि मराठी मध्ये टंकलेखन ३० श.प्र.मि. |
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | १० वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. |
मुख्य सेविका/ पर्यवेक्षका | समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण पदवी |
पशुधन पर्यवेक्षक | पशुवैद्यक शास्त्रातील पदवी |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | भौतीकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ प्राणीशास्त्र/ सूक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | १२ वी उत्तीर्ण + इंगजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. |
वरिष्ठ सहाय्यक (लिपिक वर्गीय) | कोणत्याही शाखेतील पदवी |
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | B.Com + ०३ वर्ष अनुभव |
विस्तार अधिकारी (कृषी) | कृषी पदवी किंवा समतुल्य |
विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) | १) ५०% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com २) B.Ed ३) ०३ वर्ष अनुभव |
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघु पाटबंधारे) | १) १० वी उत्तीर्ण २) स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर |
वेतनश्रेणी : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
वयाची अट : १८ ते ३८ वर्ष (SC/ST : 05 वर्षे व ओबीसी : 03 वर्षे सूट)
अर्ज फी :
- खुला – १०००/- रुपये
- राखीव – ९००/- रुपये
नोकरी स्थान : नागपूर
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२३
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जिल्हा परिषद नागपूर भरतीसाठी अर्ज कसा करावा
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावेत.
- अपूर्ण माहिती अर्जासोबत असल्यास अर्ज अपात्र ठरेल.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
लवकर नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी खाली दिलेल्या Whatsapp लोगोवर क्लिक करून, आमचा ग्रुप जॉईन करू शकता.